पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

घर

घर कौलारू कौलारू
 त्यावर चढे शांतीचा वेलू
 घरापुढे रे सुंदर बाग
 जसा सोनियाचा बा साज...... ll1ll
 घर झोपडी झोपडी
परी नसे महालाहुनी थोडी
 जेव्हा वसे तेथे प्रेम माया
 तेव्हा भासे चैतन्याची छाया...... ll2ll
 घर सुंदर सुंदर
 असे देवाचे मंदिर
 जेव्हा नसे घरी कलह
 तेव्हा भासे सुखाची चहल...... ll3ll
 घर बंगला बंगला
 सजव माणसांनी चांगला
 नको फक्त वस्तू यंत्र
 हाच खरा सुखाचा मंत्र......... ll4ll
 घर उदास उदास
 जेव्हा तेथे मत्सराचा वास
 नको पैसा नको धन
  हवे फक्त समाधान............. ll5ll
 असे असावे अपुले घर
 वाहे तिथे प्रेमाचा निरझर
 तेथे सदा कुरकुर
 माणसे नको रे अति दुर......... ll6ll 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू