ती आणि तो
ती आणि तो
ती आणि तो शरीर वेगळे,
मन मात्र सारखे!
तो दिसतो कणखर,
पण हळव्या प्रसंगी,
त्यालाही फुटतो गहिवर!
त्याच्यातही वसते कोमलता....!
ती असते नाजूक ,ती हळवी
येतो जेव्हा संकटांचा डोंगर
तीही लढते हिंमतीने
वसते तिच्यातही कणखरता....!
वरवर केला जरी विरोध,
त्याला माहिती आहे!
त्याला नेहमीच गरज आहे,
तिच्या मदतीची.....!
तीनेही जरी मारल्या गप्पा,
कितीही स्वयंपूर्णतेच्या!
तिलाही माहित आहे,
तिला नेहमीच गरज आहे,
त्याच्या आधाराची....!
प्रेम,वात्सल्य,ममता,
जरी वसते तिच्या अंगी!
तर शौर्य, धैर्य, निडरता...,
यांचा तो धनी...!
मानले दोघांनी मी भिन्न....,
तर दोघेही राहतील अपूर्ण...!
करूया आदर एकमेकांचा..,
हाच उद्देश नियतीचा..!
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-सौ.सोनाली संदीप गाडे
