महिलादिन
घरात ती आई असते,
घरात ती ताई असते,
घराबाहेर पडताच ती,
फक्त एक बाई असते...
ती घरातही राबते,
ती बाहेरही काम करते,
घाणेरड्या नजरांची,
मग ती बळी का ठरते..?
ती कमावती असते,
ती सुशिक्षित असते,
तरीही का घराबाहेर,
ती सुरक्षित नसते..?
वर्षातून एकदाच तिची,
महती गायिली जाते,
वर्षभर दुय्यमपणे,
का तिला पाहिली जाते..?
मान-पानाची कधीही,
ती भुकेली नसते,
फक्त एक सन्मानच ,
तिला स्थान हवं असते...
ते स्थान जेव्हा मिळेल,
तोच महिला दिन खरा,
तोवर महिला दीन म्हणजे,
केवळ दिखावाच सरा....
©®सतीश कदम.९८२०९४९९५३.