दास रामाचा
दास श्रेष्ठ
अष्टाक्षरी
चैत्रीतील पौर्णिमेला
राम भक्त जन्मा आला
धन्य झाले अंजनीला
पराक्रमी पुत्र झाला
जन्माताच झेपावला
सूर्यबिंब स्पर्षायला
वानरांचा नेता आला
दशानना जिंकायला
हनुमंत नाम त्याचे
रूप हे शक्तीभक्तीचे
आत्मविश्वास बळाचे
स्थान जनांच्या श्रद्धेचे
तू महा तेज रुद्राचे
हृदयी स्थान श्रीरामाचे
कार्य केले श्री प्रभूचे
श्रेय सीतेच्या मुक्तीचे
मंद्राद्रीस आणविला
संजीवनी मिळवाया
निपचित लक्षुमणा पाजुनिया उठविला
उल्लंघाया सागराला
द्याया संदेश सीतेला दास लंकेस पोचला
रावणही धास्ताविला
रामसेतू निर्मिताना
प्रेरक तू वानराना
केले आश्वस्त प्रभुंना
धाक पडे दशनाना
महा पराक्रम केला
लागे लंका दहनाला
रावण पराभवाला
हनुमंत साठी झाला
मातासीता मुक्त झाली
वचनाची पूर्ती केली
शौर्या धैर्य शर्थी केली
कीर्ति सर्वलोकी गेली
कृपामय हनुमंत
वंदनीय जगतात
हनुमंताच्या भक्तीत
रत माझे नित्य चित्त
जन्मदात्या अंजनीला
अभिमान मारुतीचा
पुत्रा जसा हा सीतेचा
काळ जणू दुर्जनांचा
मी घालीते दंडवंत
दैवत जे हनुमंत
देई संकटात साथ
हनुमंत नाम गात
@ अंजना कर्णिक, मुंबई
राम नवमी २००२४
