पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती अशी

ती अशी २७ 

तंग बरमुडा घालूनी

पोटरी उघडी टाकूनी

वर स्लिव्हलेस झबले चढवुनी

मम कलिजा खलास करते

ती अशी झोकात चालते


झिपऱ्या उनाड सावरीत

कमान भुवईची उडवीत

लाली ओठांची सांभाळीत

कोपऱ्यात ओठ मुडपते

ती अशी झोकात चालते


साखळी कुत्र्याची डाव्या हाती

ऐटीत चाले तिचा तो साथी

पाहुनी दोघांची अतुट प्रीती

मन माझे आतून जळफळते

ती अशी ........


वाटते कधी पाहील मज कडे

स्मित हास्य देईल गालामध्ये

मग देईन मी ओळख तिजकडे

विचाराने ह्या काळीज हे धडधडते

ती अशी ......


वाटते करून हिय्या सुप्रभातम म्हणावे

झिडकारून त्या कुत्र्या, तिजबरोबर चालावे

चार शब्द प्रेमाचे तिजबरोबर बोलावे

पण? बायकोबरोबर असताना जीभ अडखळते


जयश्री देशकुलकर्णी 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू