पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मेहंदी

मेहंदी


मेहंदी

गोर्‍यापान हातावर 

मेहंदी सुबक रंगली!

नावाचे अक्षर कोरताच

आठवण तुझी मनी आली!

 

दुर अंतरी जरी तू

तुझा चेहरा हातावर दिसतो.!

रंगलेल्या मेहंदीतुन 

तु माझ्याकडे पाहून हसतो! 


प्रेम किती तु करतोस 

बोलुन दाखविले नाही कधी!

रंगली एवढी मेहंदी हातावर 

प्रित आपुली नाही ती साधी!


हातात मेहंदी जशी रंगली

मी तुझ्या प्रेमात दंग झाली!

आठविली मज तुझी प्रित

मी तुझ्या प्रितीत हरवली!


अशीच खुलत राहो

हातावर सदा मेहंदी माझी!

प्रितीचे स्वर गुंजत राहो

मी सदैव बनुन राहो तुझी.!


मोहन सोमलकर नागपूर 

©️®️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू