पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेरणेचा सुगंध_ स्वामी विवेकानंद

   कलकत्त्यात विश्वनाथ भुवनेश्वरीउदरी

    प्रसवला एक गौरवर्ण तेज:पुंजधारी

   आदर्शांसाठी चंदनापरी देह झिजावा

    स्वामीजी फिरुनी घ्या जन्म नवा.



    प्रेरणास्थान होते युवापिढीचे

   आवाहन केले ध्येय गाठण्याचे

    उदात्त कार्यातूनी गौरव व्हावा.

   स्वामीजी फिरुनी घ्या जन्म नवा.



     नवयुगाचे केले नवसृजन

    नवीन भारताचे बांधले कंकण

   प्रभाव तुमचा नव्या पिढीला यावा

   स्वामीजी फिरुनी घ्या जन्म नवा.


    सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी

   अमेरिकेत भाषणाची सुवर्णसंधी

    प्रखर वकृत्वाने जिंकली सभा

  स्वामीजी फिरुनी घ्या जन्म नवा.



  रामकृष्ण होते आध्यात्मिक गुरु

 आध्यात्माचा जीवन प्रवास सुरु

 रामकृष्ण मिशनद्वारे समाजसेवा

 स्वामीजी फिरुनी घ्या जन्म नवा.


   प्रखर तेज, होता व्यासंग दांडगा

  अंतरीप्रवाहे शुध्द विवेकाची गंगा

    तव स्मृतींचा सुगंध दरवळावा

  स्वामीजी फिरुनी घ्या जन्म नवा.


  अदम्य साहस, कुशाग्र बुध्दी

  युवा संन्यासी म्हणून प्राप्तसिध्दी

  तत्वज्ञानातूनी तरुणांनी तोल सावरावा

   स्वामीजी फिरुनी घ्या जन्म नवा.



 कट्टरतावाद,सांप्रदायिकता धिक्कारिले

    जगभर शांतीचे संदेश दिले

 तेजस्वी शिकवणीने प्रभावित युवा

  स्वामीजी फिरुनी घ्या जन्म नवा.


       सौ स्वप्ना जगदळे नागपुर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू