मित्र
शीर्षक:: मित्र
मित्रा,तू येतोस
एक नदी येते
बरोबर थंड पाण्याचा
प्रवाह घेऊन.
मी पाय भिजवून बसते
आणि धूवून टाकते
माझ्या मनातील मळ.
मित्रा, तू येतोस
तुझ्या बरोबर येते
थंड वा-याची झुळूक.
उडवून टाकते धूळ,
मनाच्या आरशात
बघते मीच
माझे खरे रूप.
मित्रा, तू येतोस
बालपण घेऊन
खेळ्तोस माझ्या सोबत
आठवणीतले खेळ.
तेव्हा मिळते मनाला
पुन्हा एक नवी ऊर्जा.
मित्रा, तू वाटतोस
पहाडा सारखा
दवाखान्यात.
आय. सी. यू. च्या बाहेर
येतोस औषधाचे पुडके घेऊन.
उभा असतोस
द्रोणागिरी पर्वता सारखा
माझ्या समोर.
काविता पुणतांबेकर 'कुमुद'
शाजापुर मध्य प्रदेश