आषाढी एकादशीनिमित्त माझ्या चार ओळी
आषाढी एकादशी निमित्त माझ्या चार ओळी
यावे तुझ्या पायाशी, राहिली एकच मनी आस।
दर्शन दे विठ्ठला मायबापा, विनविते जोडुनी दोन्ही हात।
मी नाही तुकाराम, नाही मी पुंडलिक,
नाही जनाबाई ती थोर।
मी तर साधी कामकरी,जशी रामाची शबरी,
जसा कृष्णाचा सुदामा।
आळवणे तुला हाच माझा ध्यास
स्मरावे तुला रात्रंदिन हाच माझा श्वास ।
ध्यानी मनी स्वप्नी, तुलाच बघावे हिच मलाआस
सावळे रूप सुंदर ,चंदन टिळा कपाळी।
तुळशी माळा गळा ,भंडारा उधळी
दिंड्या पताका घेऊन वैष्णव नाचती
भक्तांचा त्राता तू,भक्त तुझ्यावर विश्वसती
विटेवरी उभा तू कटेवरी हात
जळी स्थळी पाषाणी दिसे तू मला
हे रखुमाई कांत
पंढरी कसे यावे देवा
पाय थकले,कुडी झिजली
डोळे शिणले,कान बधिरले।
जाणशी तू भक्तांची आस
दर्शन दे रखुमाई कांत
परतीची वाट दिसु लागली
आस तुझ्या दर्शनाची मज लागली
आस तुझ्या दर्शनाची मज लागली
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
पुंडलिक वरदा हारी विठ्ठल
कवियत्री
सौ अर्चना कुलकर्णी
