वारी पंढरीची
आषाढीच्या मासी | निघाली वारी|
चंद्रभागे तिरी | पोहोचण्या ||
दुमदुमे वारी | विठू गजरात |
टाळ मृदुंगात | जयघोष ||
घालीते रिंगण| एक दोन तीन |
चीत्ती लगो ध्यान | पांडुरंग ||
संतांची पंढरी |अवघे माहेर|
देहाचा विसर | पडत असे||
ज्ञानोबा माऊली | गजर मुखीचा |
सोहळा वारीचा | रंगवित ||
वारीमध्ये नसे | कोणा भेदभाव |
दर्शनाची हाव | विठुराया ||
विठ्ठलाची भेट | होई धन्य मन|
वारीला जाऊन | समाधान ||
????????????????????????????????????
कवयित्री :-
सौ संगिता तुळशीराम पवार मुंबई
