पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विठ्ठला...

भोळ्या माझ्या मनाचा

भाव तू विठ्ठला

जीवनाच्या विसाव्याचा 

गाव तू विठ्ठला ।।


रित्या हाती माझ्या

टाळ तू विठ्ठला

थकलेल्या पायी माझ्या

बळ तू विठ्ठला ।।


ऊन वारा पावसाचे

रूप तू विठ्ठला

भेटलेल्या प्रत्येकाचे

स्वरूप तू विठ्ठला ।।


भुकेल्या भावनांचा

ध्यास तू विठ्ठला

देह माझा पंढरी

श्वास तू विठ्ठला ।।


मन माझे मोगरा

सुगंध तू विठ्ठला

सुंदर माझ्या जीवनी

अभंग तू विठ्ठला ।।


आयुष्याला पुरेल इतुके

 धन तू विठ्ठला

आनंदाने बहरलेले

जीवन तू विठ्ठला ।।


श्री.संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू