तुझी तू जग,जग गेलं उडत, एव्हढ सोपं आहे का?
मी ऐकली एक कविता भाराऊन गेले पार
फक्तं आपल्या मनाचच ऐकायचं ठरवून टाकलं आज
मी माझ्याच मनाचच ऐकणार जग गेलं उडत पण
विसरले होते मी की मुलं बाळं नवरा ह्याच जगात येतात, सगळंच मुसळ केरात गेलं
नातवंडांनीं शिरा मागितला पाठ दुखत होती तरी तसाच केला.दुधा वरची साय नातवंडे कसं मोडायच मन?
कोणी नसलं तरी चालेल म्हणणं सोपं आहे
तूझी तू जग हे जरा जास्तच होतंय
कुठे राहणार बाहेर पडून?म्हणजे कोणाकडे तरी जाणं भाग मग कशी तुझी तू? हे बोलणं सोपं पण प्रत्यक्षात आणणं कठीण
तुला वाटलं तर तू हस पण असं होत नाही दुसऱ्याच्या आनंदात हसावं लागतं.दुसऱ्याच्या दुःखात रडाव सुद्धा लागत. लिहायला सोपं पण वागायला कठीण तुझी तू रहाणं
संसाराचा गाडा अंगावर घ्यायच्या आधी विचार करायचा
मनाचं आईकायच की संसार सुखाचा करायचा
आपल्यासाठी आपले पण मन मारत असतात कित्येकदा आपल्यासाठी त्यांचं मन मोडत असतात
संसार म्हणजे आनंद दुःखाची देवाण घेवाण असते
सगळं कोणाच्याच मनासारखं होत नाही ह्याची जाणीव असते
मैत्रिणींनो संसार मांडला आहात ना मग मन सुद्धा मांडा.कधी मनासारखं तर कधी मन मारून जगा
एकमेकांना साथ देऊन सुखान जगूया
मी तुला साथ देते तशीच तू मला दे
चल संगती चालू हातात घालून हात
वर्ष कुठलं ही असो देऊ एकमेका साथ
