पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कृष्ण म्हणजे?

कृष्ण म्हणजे राधेचा ध्यास 

कृष्ण म्हणजे सत्यभामेचाजळफळाट

कृष्ण म्हणजे  द्रौपदीचा रक्षण करता  सखा

कृष्ण म्हणजे कुंतीचा  श्वास 

कृष्ण म्हणजे गोपिकांचा आत्मविश्वास

कृष्ण म्हणजे युधिष्ठिरा चा धर्म

कृष्ण म्हणजे कंसाचा ऱ्हास

कृष्ण म्हणजे सुदामाचा सखा

कृष्ण म्हणजे यशोदेची परीक्षा

कृष्ण म्हणजे वासुदेवाचा निश्चय 

कृष्ण म्हणजे दुर्योधनाचे आव्हान

कृष्ण म्हणजे अर्जुनाचे श्रध्दा स्थान

कृष्ण म्हणजे यामुनेचा खळखळाट

कृष्ण म्हणजे कालियाचा जळजळाट

कृष्ण म्हणजे बासुरी चे मधुर सूर

कृष्ण म्हणजे मोरपिसाची निळाई 

कृष्ण म्हणजे मिरेची भक्ती

कृष्ण म्हणजे सोळा सहस्त्र राण्यांची मुक्ती

 कृष्ण म्हणजे आयुष्याची दिशा

कृष्ण म्हणजे जीवनाची परिभाषा

कृष्ण म्हणजे भगवतगीता

कृष्ण म्हणजे स्वतः ची अस्मिता

कृष्ण म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय

कृष्ण म्हणजे संसाररूपी सागर पार करण्याचा एकमेव मार्ग

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू