ओढ श्रावणाची
कविता :- ओढ श्रावणाची
बहर सुखाचा नेसलेला भुवनी,
नवरी सारखी नटली अवनी.
आसमंत सौख्याचा आज जीवनी,
शालू हिरवा या धुंद श्रावणी.
मेघ बोलती हृदयाची बात,
म्हणूनच करती बरसात.
ओंजळी भरल्या जोडुनी हात,
आशिष हरदम मिळो साथ.
गुंतूनी ठेविले नयन मी,
नजारे पाहता चिंब मी.
सडा समृद्धीचा आहे जादू ही,
भ्रमण करत फिरावे आस ही.
पावनात पावन सोहळा श्रावण,
सणांची शृंखला करावे नमन.
ओढ अशी लागली वाट पाहता,
भक्तीने आणले तुजपर्यंत वाहता.
अशा सुंदर क्षणांची दिपावी माळ,
नाचावे पवनाचे बांधून चाळ.
येई डोळा पाणी, सुखाची गाणी,
नाम प्रभूचे हीच अमृतवाणी.
