श्रावण (शेतकरी -बायाबापड्यांचे संवादी काव्य)
श्रावण
(शेतकरी बाया-बापड्यांचे संवाद काव्य)
नाकातली नथनी पायात जोडवे
आनाल ना कारभारी ..?
पिक पिकूं दे ,समदं विकूं दे
आनिन गं कारभारीन
निस्तच बोलता घोर लावता
दिसभर फकस्त राबनं
नाही गं रानी नको गाऱ्हानी
गोड धोड श्रावनात रांध नं
नागपूजेला जाते मी माहेरी
भावाचं आलं आवतन
नको गं लक्ष्मे ,बोलव भावाला
हतंच करु गोडाचं जेवन
येता लेक झुला बांधुया
करु तिचं माहेरपन
हो गं रानी ,मायेची लेक
ती दिसताच डोळ्यात श्रावन
सुरेखा कुळकर्णी , वसई
