श्रावण
स्पर्धेसाठी
श्रावणाचा मास आला
घेऊन आनंद सारा
माहेराची सय आली
चला फेर धरू चला
सणासुदीचे दिवस
आणी मास श्रावणाचा
लेकी बाळी सुना आल्या
सहवास माहेराचा
श्रावण नाचे अंगणी
दु:ख सारे विसरुन
पंचमीच्या सणासाठी
लेकी येतात सजून
येई मंगळागवर
शंकराची अर्धांगिनी
विसरावी दु:खगाणी
मिळुनिया साऱ्याजणी
सोमवारी बेलफुले
अर्पुनिया शंकराला
करू षोडशोपचारे
चला जाऊ मंदिराला
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
