मनातील राम जपा
रावण दहन झाले, पण मनातला रावण अजून डोकावत होता |
माझे दहन व प्रभू रामाचे पूजन का ? म्हणून विचारात होता |1|
मनातले कल्लोळ पण विचारत होते, रावणाने सीतेला तर स्पर्श केला नव्हता |
तरीही माझे दहन ,आणि बलात्कारी मात्र मोकाट फिरत असतात |2|
हे बघून मनातला रावणच म्हणाला, माझ्या असंख्य पापाला मुक्ती दिली प्रभू रामाने |
परंतु सोडून दिले ना मोकळे आजच्या रावणाला तुमच्यातील प्रत्येकाने |३|
त्यावर अंकुश कोण ठेवणार, आणि कोण न्याय देणार घराघरातील सीतेला |
काय म्हणावे रामालाच विरोध आणि रावणाचे गुणगान करणाऱ्याला |४|
शेवटी मनातील रावणच
म्हणाला माझे तर दहन केले प्रभू रामाने, परंतु मना मनातील रावणाने पुन्हा सीता मातेचे हनन
केले |
याच मना मनातील रावणाने सीतेला वनवासी आणि रामाला पुन्हा एकटे केले |५|
म्हणून म्हणतो मनात राम जपा, म्हणजे बलात्कारी अत्याचार करण्यास धजणार नाही |
परंतु मनात राम नसेल तर रावण असणारच, आणि, मग रावणाला दंडित करणारे कोणीच असणार नाही |६|
ही प्रवृत्ती बदला , प्रत्येक नर राम आणि नारी सीता होईल |
तेव्हाच अत्याचार सांडतील, सदाचार वाढतील आणि मगच स्त्री मुक्त होईल |७|
जय श्री राम
राजेंद्र बेनोडेकर
