हिंदुत्वाची शान,भारतिय संविधान
हिंदुत्वाची शान,भारतिय संविधान.
विस्तृत नीतीनिर्देशक,
अभिव्यक्तीचे साधन आहे .
स्वयंप्रेरणा भीमरावांची
स्वतंत्रतेचा स्वाभिमान आहे.
हिंदुत्वाची शान आमुचे
भारतीय संविधान आहे.
गीते सम पवित्र ,ओजस
राष्ट्रग्रंथ, देशाचा गौरव आहे.
नियमबद्ध, सशक्त, समृद्ध
लोक कल्याणाचा आधार आहे
हिंदुत्वाची शान आमुचे
भारतीय संविधान आहे.
मानवतेचा तो संरक्षक ,
शोषितांचा आवाज आहे.
विश्वबंधुत्वाचा तो आश्वासक
धर्मनिरपेक्षतेचा पाया आहे.
हिंदुत्वाची शान आमुचे
भारतीय संविधान आहे.
प्रजासत्ताक दिन म्हणून
मिळतो त्यास सन्मान आहे
घटनेचे शिल्पकार म्हणूनी
जगी बाबासाहेबांचा मान आहे.
हिंदुत्वाची शान आमुचे
भारतीय संविधान आहे
संजीवनी बारगळ
- इंदोर.
