पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अशी माझी कविता



भाव अंतराचे बोलते कविता 
शब्द सुमनांनी डोलते कविता
शब्दालंकारांनी सजते कविता
सौंदर्याने मन मोहते कविता 
                
अबोल शब्दांना मांडते कविता 
विचारांपलीकडे हिंडते कविता
मनाचे विविध रंग सांडते कविता
कधी हक्कासाठी भांडते कविता

इतिहासाची गवसणी करते कविता 
अभिमानाला त्वरित उतरवते कविता 
फुलांप्रमाणे सौंदर्याने लाजते कविता 
 कधी तलवारीचे घाव घालते कविता

गोरगरिबांची कळ सोसते कविता 
रसिकांच्या मनाला भावते कविता 
समाजाचा छळ दाखविते कविता
अलंकार वृत्त कधी मुक्त हसते कविता

मनाच्या फुलोऱ्यात फुलते कविता
हृदयाच्या गाभाऱ्यात लपते कविता 
प्रत्येकाच्या मनात असतेच कविता
शब्दानी मुक्त व्यक्त होते कविता.





मिनाक्षी जगताप मिनू सुरत गुजरात

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू