गुढीपाडवा सण
आज दिनांक ३०\०३\२५ रविवार रोजी चैत्र मासारंभ होत आहे. चार नवरात्रपैकी हे चैत्र महिन्याचे नवरात्र आहे. म्हणजेच मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच येणारे गुढीपाडव्यापासून सुरु होणारे नवरात्र होय. शारदीय नवरात्र प्रमाणेच हेही नवरात्र पूजनीय व पावन असते. शारदीय नवरात्र दिवाळीच्या आधी ऑक्टोबर महिन्यात येते. चैत्र नवरात्र एप्रिल महिन्यात येते. वर्षातून चार नवरात्र येतात. बाकी दोन नवरात्र क्वचित लोकांना माहीत आहे. उद्यापासून पुढे रामनवमी पर्यंत हे नवरात्र असते. एकाच दिवशी म्हणजेच उद्या प्रथमा व द्वितीया आली. सहा तारखेला नवमी म्हणजेच रामनवमी आहे. त्या दिवशी रामजन्म आहे. चैत्र नवरात्रीला रामाचे नवरात्र देखील म्हणतात. उद्याच्या गुढीपाडवा सणानिमित्त सर्व बंधुभगिनीना हार्दिक शुभेच्छा.!
गुढी उभारू दारी
करु नववर्षाची तयारी!
गुढीपाडवा सण
गुढीपाडवा सण
पावित्र्याचा अन मांगल्याचा
गुढी उभारु दारी
करु नववर्ष स्वागताची तयारी
समानता,सौख्य ,समृध्दीसाठी
गुढी उभारी मांगल्याची
साखरेची गाठी
बांबुची काठी
खण पवित्रतेचा
ती सुमनांची माळ बहाल करु
पवित्र आंब्याची पाने
त्याचे तोरण दारात बांधु
गोडधोड घरी सिजवुन
पुरणपोळीचा नैवेद्य दाखवुन
सुखाचे हे नववर्ष जावो
देवाला प्रार्थना करु...!
--------------------------------
झाली मंगलमय पहाट
तेजोमय किरणांची आली लाट
दिवस हा आजचा मंगलमय ठरला
चैत्राचा पहिला दिवस गुढीपाडवा आला
पावसाचे थेंब पडले दारी
सुहास मांगल्याचा पसरला!
मंगलस्नान करुनी घालु अंगणात रांगोळी
दाराला तोरण बांधुन स्नेह दाटला!
मनात साखरेचा गोडवा ठेऊ
सुखसमृध्दीची कास धरू!
जिव्हाळा,आपुलकी,स्नेहाची
गुढी ती मांगल्याची दारी उभारू!
सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
मोहन सोमलकर नागपूर
