पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वडद की अंबराई

*बंधूराया*

         *मुक्त छंद* 

नाही कळले मलाच काही.....

नाही कळले मलाच काही
घात कसा हा झाला
हसरा चेहरा,उंच फार माझा भाऊ
भोला _भाला मन चांगला
नाही कळले मलाच काही.!!१!!


बोल बोबडे किती मधुर
नाजूक काया,विचार सुंदर
किती त्या खोड्या,किती नाटके
तुझ्यासाठी परी लाडकी मी बहीण 
नाही कळले मलाच काही..!!२!!


अभ्यासात तू रातकीडा 
आई_ बाबांचा तू राजकुमार
मी अभागी बहीण कसी रे
माझ्यासाठी तू बंधुराया
नाही कळले मलाच काही.!!३!!

हाती पुस्तक घेऊन ,लांब शिक्षण
सोडून आईं _बाबा राहिला बहिणी जवळ
बंधू माझा पाठीराखा,सोडूनी का गेला रे तू?
कोण घेईल साडी_चोळी,अश्रू
माझ्या नयनी
नाही कळले मलाच काही.!!४!!


२९सप्टेंबर दिवस शनिवार
देवाचे दर्शन,दादाचे विसर्जन
१०ऑक्टोंबर, राहिला रे जन्मदिवस
हात जोडूनी करतो सतसत वंदन (नमन)..!!५!!

       

स्वरचित कविता
स्वतःवर घडलेले अनुभव

सौ: ओमलता परिहार/पटले

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू