पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आम्ही शिक्षक... देशरक्षक..

*आम्ही शिक्षक... देशरक्षक...* 

आम्ही शिक्षक 
घडवितो देशरक्षक 
नष्ट करण्या 
समाजभक्षक 

कळ्या उमलतांना
जपतो आम्ही 
फुलं होतांना त्यांना 
हर्षितो आम्ही 

मित्र, बंधू, नातेवाईक
प्रसंगी होतो आई
संस्कार देता देता होतो
पूर्वजन्माचे उतराई

कर्तव्य, शिस्त, परिश्रम शिकवितो
सद्गुणांचा सुगंध पसरवितो
कर्तव्य, शिस्त आणि परिश्रमाने
भविष्याचे सुंदर शिल्प घडवितो

कुणी डॉक्टर, वकील, इंजिनियर 
भेटतात विविध वळणावर 
रोपट्याचे वटवृक्ष होताना 
बघून आनंदितो आम्ही 

सत्य, प्रेम, सेवा करुणा
हीच आमुची खरी भावना
विद्यार्थी व्हावा आदर्श नागरिक
हीच आमुची प्रार्थना

श्रीराम, श्रीकृष्णानेही 
गुरूंकडून ज्ञानामृत घेतले
याचसाठी कदाचित
विद्यादेवीने आम्हास नेमले

आम्ही शिक्षक महान
देशाचा सार्थ अभिमान

 *कवी -योगेश पाटील (ललित )*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू