सातबारा वरील शेतकरी
*सातबाऱ्या वरील शेतकरी*
सर्व जीवन माझे,
तुझ्याच चरणात,
बसता उठता दिसतो,
चऱ्हारा रे स्मरणात...
काम करून दमतो,
पण थकवा जाणत नाही,
केले नाही काम तर,
कशी होईल रं सोई...
याचं चिंतेने झोप
उडाली का तुझी...
मी पण आहे शेतकरी,
लागेल का मदत माझी...
फरक आहे एवढाच,
मी श्रम नाही करीत..
ठोक्याने देतो शेती,
स्वतः नाही पेरत...
दुरूनच देतो सांत्वना,
तुझ्या रे दुःखात..
आम्ही झालो स्वार्थी,
जगतो आहे सुखात...
आज आलो गावाला,
बघितलं शेतकरी,
भाजला आहे सारा,
अन पंप पाठीवरी..
शरण जाऊ तुला,
मागतो आहे दान,
काही झाले तरी चालेल,
रहा स्वामीमनानं...
जय गजानन..
श्री गजानन...
(सुधाकर राठोड)
