दोघे अनोळखी
दोघे अनोळखी आम्ही असेच नकळत भेटलो.
नजरेस नजर भिडली आणि एकमेकात हारवून गेले...
माझं मला समजलं नाही कधी त्यांच्यामध्ये हरवून गेले.
हळूहळू रोजच भेट होत गेली..
आणि बघता बघता आम्ही दोघांचे एक होऊन गेलो..
आणि सुरू झाला आमच्या जीवनाचा प्रवास.
रोजचा सहवास वाढत गेला,..
आणि कधी त्यांच्या प्रेमात पडले माझं मला समजलं नाही....
आता ह्या जीवनाच्या प्रवासात त्यांच्या शिवाय जगणं आता मला तरी शक्य नाही.
आणि माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे शब्दात सांगणे मला तरी शक्य नाही..
