शेतकरी
शेतीचा केला विकास
मेहनतीची धरुनी कास
एकच मनी ध्यास
निसर्गाचा हवा सहवास
काबाडकष्ट करुन अशिक्षित शेतकरी शेतात राबतो. झाडाच्या सावलीत घटकाभर विसावा घेतो. निसर्गाच्या सान्निध्यात तो सदैव रहातो. ब्लडप्रेशर, शुगर कोणतीच आरोग्याची तक्रार त्याला नसते. मोकळ्या हवेत तो श्वास घेतो...!
मोहन सोमलकर नागपूर
