पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भुकेचा खेळ

 जेवणाची वेळ
भुकेचा खेळ
प्रसंगाला चालते
ओली सुखी भेळ

श्रीमंती खानदान
करती अन्नदान
मग भुईवर पान
कसला मानपान

उपवासा वेळी
केमिकल केळी
भक्ती शुद्ध दुबळी
खिचडीत शोधे नळी

जीवो जीवस्य जीवनम्
शाक मांस भक्षितम्
नवरस जिव्हा जितम्
अन्न आरोग्य रक्षितम्

जीवनी तीन मुद्रा
भुक शौच निद्रा
श्रीमंत वा दरीद्रा
अटल ह्या भावमुद्रा

जगी सारे अन्न
आहे पुर्णब्रम्ह
राखू तारतम्य
हे भुकेचे गम्य

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू