पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

डॉक्टराक्षर

लहानपणी अभ्यास केला तेव्हा अक्षर होतं खुप भारी
घासुन घासुन अभ्यास केला तेव्हा मिळाली डॉक्टरी

एकदाचं डॉक्टर झाल्यावर मनाला वाटतं खुपच भारी
आणि मग काय ! पेशंटसची रांगच-रांग लागते दारी

मला कधी कधी कळत नाही अक्षर सुद्धा रुसतं का 

अक्षर सुधारण्याचं ईन्जेक्शन डॉक्टरकडे नसतं कां

खराबात खराब अक्षर हाच जणू असावा फॅक्टर
 का ज्याचं अक्षर अतिशय खराब तोच होतो डॉक्टर

मला वाटते खरे तर डॉक्टरांनाच तपासायला हवे
एकच औषध रोजच लिहीतात नव्याने नवे -नवे

औषधे लवकर दया म्हणून जेव्हा पेशंट कळवळतो 

शुभ्र प्रिस्कीक्शनवर अक्षरांतील गांडूळ वळवळतो


लिहीण्याआधी डॉक्टर डोळे मिटून औषधे आठवतात
पेशंटला वाटते जसे गंभीर आजाराचे निदान करतात

स्पेलिंग ध्यानात नाही म्हणून काहीही गिरबटतात
औषधाच्या नावाचे गुपित स्वतःच पित रहातात

बऱ्याचदा, पण कधी कधी मग असे काही घडते
डॉक्टरांच्या चिट्टीचे खरे कोडे रुग्णालाच उघडते

आजारी रुग्ण चिठ्ठी घेऊन भिरभिर भिरभिरतो
प्रत्येक मेडीकल दादा वाचता वाचता चक्करतो

फिरल्यावर दहा मेडिकल, वाचणारा ज्ञानी सापडतो
औषधाचा शोध घेण्यात रुग्णालाही व्यायाम घडतो

मग ॲसिडीटी पळून जाते, जुनी गुढगेदुखी बरी होते
औषधाच्या शोधकार्यात व्यायामानेच सर्दी बरी होते

जुन्यातल्या जुन्या आजाराचा पेशंट सुध्दा बरा होतो
पण डॉक्टरी संपत आली तरी अक्षरात सुधार नसतो

एकदा डॉक्टरला फाटकं प्रिस्क्रिप्शन वाचायला दिलं
दोन दिवस वाचुन म्हणाला, माझं शिक्षण वाया गेलं

कोणी लिहलयं म्हणाले, हा डॉक्टर कसा झाला?
मी म्हटलं तुम्हीच लिहलं होत, विचारा स्वतःला?

म्हणे मोत्यासारखं अक्षर होते अगदी सुरुवातीला
मग रात्रंदिवस अभ्यास केला रोग झाले अक्षराला

दवा चुकू नये म्हणून औषधासह पेशंट परत बोलवितो  

औषध पाहण्याच्या नांवाखाली स्पेलिंग पाठ करतो

अरे बाबा डॉक्टरांनो कधी कधी एम आरचं ऐका 
अभ्यासुन औषध लिहा, मग मिळेल पैकाच पैका

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू