Back to Book Details Report Reviews

मी तुझाच सखा

येत नाही उचकी, आता लागत नाही ठसका.
आठवण करत नसेल कोणी, झालो असेल परका.


मनातून तू जात नाही, विचार तुझाच सारखा.
अंधारात ही हुरहूर वाटते, सोबतीला असून तारका..

येत नाही उचकी, आता लागत नाही ठसका....


 खूप दूर निघून आलो, आठवत नाही चेहरा.

सुगंध ही विरघळला, आटला सुखाचा झरा..

येत नाही उचकी, आता लागत नाही ठसका...


प्रेम दे तिला माझे, हे नभी उडणाऱ्या पाखरा. 

निरोप दे तिला, मी आजही तुझाच सखा.. 
येत नाही उचकी, आता लागत नाही ठसका.
आठवण करत नसेल कोणी, झालो असेल परका.


प्रविण ज्यो. तायडे.

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu