काजव्यांचा प्रकाश बाकी आहे..
आयुष्य जरी संपलं. जगणे अजुन बाकी आहे.
डोळ्यावर भिंग जरी, नजरा अजून बाकी आहे.
कुंठीत जगणे मान्य नाही,
तुटल्या पंखांची फिकीर नाही.
ओढ लागली नभाची,
आता मातीशी नाते मुश्कील आहे.
अस्तित्वाच्या लढाईत अस्तित्वहीन झालो,
स्वकीयाच्या गर्दीत परका झालो.
मी माझ्याच शोधात आता,
नव्या दमाने गतिशील आहे.
दुखावलो पावलोपावली,
तो काळ माझा नव्हता.
नको आता सांत्वना खोटी,
मी खुशाल आहे .
आयुष्याचा सूर्य मावळला,
चंद्र ही विरघळला,
तरी काय भीती.
अंधारात ही वाट शोधेल मी.
अजून काजव्यांचा प्रकाश बाकी आहे.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
8830103626
