Back to Book Details Report Reviews

हसू कसा मी?

हसू कसा मी? हरपला मायेचा गारवा,
भेगा हृदयात उमटल्या, डोळ्यांत दाटला ओलावा.


जीवनभर चालत राहिलो, चुकीच्या त्या वाटेने,
ध्येय गाठीन एक दिवस, या खोट्या आशेने.


धगधगत्या लाव्यावर, आता कसा शोधू मी विसावा,
जखमांनी व्यापले अंतर, हरवला जगण्याचा ठावावा.


उरी स्वप्न घेऊन मी, घेतली होती उंच भरारी,
पंख छाटले नशिबाने, पोहोचता यशाच्या दारी.


आता मिटेल कसा, देवा तुझ्या माझ्यातला दुरावा,
राख झालेल्या मनाला, दे पुन्हा जगण्याचा गारवा…


हसू कसा मी? हरपला मायेचा गारवा....

भेगा हृदयात उमटल्या, डोळ्यात दाटला ओलावा..


प्रविण ज्यो. तायडे 

अमरावती 

8830103626

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu