वैशाख वणवा..
विषय...वैशाख वणवा..(मुक्तछंद)
*वैशाख वणवा*
वैशाख वणवा
उन्हाची चाहूल
डोईवर टोपी
बाहेर न पडे पाऊल
पाण्यासाठी सदैव
पळती लहान थोर
घसा सुकवून हिंडती
पशू पक्षी घनघोर
चारा मिळेना
मिळेना पाणी
गोठ्यात गायी
क्षुधा भागेल कशी
उन्हाचा तडाखा
पाण्याची वानवा
खाण्याची दैना
भागवू कशी
निवाऱ्यास थांबले
उडवती लेकरे
हसती जन सारे
करू कसे
एका दाण्यासाठी
भीक मागतो
दाणा पाणी
मिळवीन म्हणतो
लेकरे घरट्यात
उपाशी तडफड
त्यासाठी धडपड
मला काही नको
किलबिल झाली बंद
हंबराने घेई ओढ
केकावली निस्तेजली
धरणीच फाटली
सांगा जगायचे कसे
म्हणती वासरे
देतील आधार
घरची माणसे
ठेवू पाणी कौलावर
पक्षी येतील क्षणभर
चारा पुरवू गाईला
वाचवू या धरित्रीला
सारे येऊ एकवटुन
सारी सृष्टी वाचवू
पशू पक्षी सगे सोयरे
आनंदाने कास धरू
झाडे वाचवू
वृक्षे लावू
तोडण्यास प्रतिकार
समाजाची ताकद
आपण दाखवू
सृष्टीचे रक्षण करू.
सृष्टीचे रक्षण करू.
..............................
पल्लवी उमेश
जयसिंगपूर
29.5.26
