पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुस्तकदिना निमित्त...

विषय... जीवना पुस्तक तुझे चाळायचे


डोळ्यांची ही महिरप उघडूनी
प्रथम न्याहाळले मी सारे जग
आक्रंदन करून दिली मी चाहूल
पहिल्या श्वासाने टाकले पाऊल


परिवार हेच माझे असे सुंदर जग
नाती गोती संगे कळले एकेक नग
म्हणे कुणी कुणाचे नसते जगती
असती देखाव्याची ही नाती नुसती


पुलाखालून पाणी अखंड हे वाहती
अनुभवाची शिदोरी ही वाढत जाती
कष्टास नसे अंतर परी पार तीरावर
तरुन जाय संगे पुस्तकांचा आधार


मैत्र हे जीवांचे उघडी ही वाचनालये
सवंगडी ही इथली बनली ती पुस्तके
विद्यापीठाची पदवी नोकरीची हमी
येती फिरुनी मग चिकटली ती नाती


दैवाचे फासे कधी न कळले कुणाही
येती फिरुनी मग शुक्रवारची कहाणी
आता जीवना पुस्तक तुझे चाळायचे
पाना पानातून अर्थ नव्याने उलगडायचे

........................................................
✍️ पल्लवी उमेश
जयसिंगपूर
24.4.26

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू