पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवणींचे गाव

गावाकडच्या आठवणी.....


आठवणींचे गाव......


डोंगराच्या पल्याड दिसे मज
वसलेले आजीचे कौलारू घर,
नदीचा खळखळाट तो अफाट
घुमे आसमंत, सारा शिवार। ..१


पतवंडांची फौज येई भरभर
गोष्टी आजीच्या मग ढीगभर,
खेळ खेळूनी वानरे उंदडती
दिवेलागणीला परवचा म्हणती। ..२


गाव मोठा, त्याची घरे न्यारी
बिनकुलुपाची दारं सारी,
परिसा सम ह्यांचे आभाळ मन
सारीच आमची मायबाप जन। ..३


निसर्ग आमुचा असे मास्तर
त्याच्या कुशीत आमचे अंगण,
कोंबड्यांचे आरव, पहाट होई
येई वासुदेव, गाणं गोड गाई। ..४


गावचा बाजार, कृषी शेतकरी
धन्य त्रिभुवनी आमुची पेरणी,
गावशाळेतूनी शहाणी कार्टी
बनली पुढे साहेब, मोठी ज्ञानी। ..५


गावाकडचा माझा वाडा
आज स्मरतो मला एवढा,
चार पिढ्यांची होती रेलचेल
आता उरली आठवणींचीच रेल। ..६

........................................


✍️ पल्लवी उमेश, जयसिंगपूर

27.4.26

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू