पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उन्हाळा


विषय..उन्हाळा

🌞 *उष्णतेची लाही*

असह्य हा उकाडा
होते लाही अंगाची
सहन होत नाही काही
सांगता येत नाही
करावे काय कळत नाही

पोटासाठी नोकरी
नोकरीसाठी छत्री
स्कार्फने झाकले तोंड
हात-पायही झाकले तरी
मन मात्र शांत होत नाही
करावे काय कळत नाही

ऑफिसात टाकले पाऊल
बसले खुर्चीत वाकून
पाणी पिते गटागटा
पंखे फिरती गरागरा
तरीही थंडावा मिळत नाही
करावे काय कळत नाही

साहेबांच्या चेंबरमध्ये एसी
आम्ही मात्र पंख्यापाशी
गरम वाऱ्याने नाकी दम
पारा चढतो टमाटम
समानता दिसत नाही
करावे काय कळत नाही

उष्णतेची लाही लाही
सूर्यदेवाची ड्युटी जारी
पृथ्वी मातेला दंड दिधला
वृक्ष तोडीचा हिशोब देखिला
करावे काय कळत नाही

उष्णतेने कळस गाठला
सत्तेचाळीस अंश पारा चढला
शेतकरी विषण्ण झाला
गुरे, पक्षी सारे कासावीस
करावे काय कळत नाही

आता तरी शहाणे होऊ
एक तरी वृक्ष दारी लावू
जपू हरित क्रांती आपण
समतोल साधू निसर्गाचा
उज्ज्वल सृष्टीस देऊ संजीवन


-------------------------------------------

©पल्लवी उमेश ✍️🌿
जयसिंगपूर
28.4.26

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू