पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पूजा वटवृक्षाची...

*पूजा वटवृक्षाची......*


सण आला ज्येष्ठ पुनवेचा
सजला सण सुवासिनींचा
चला सख्यांनो जाऊ बिगी
आनंद घेऊ वटपूजनाचा !!१!!

न उरले आता वृक्ष सोयरे
कत्तली होई हव्यासापायी
पूजेस आता न वड मिळे
फांदी मिळे पैशापायी !!२!!

सावित्रीचे प्रेम आगळे
आज न त्याची आच कळे
पुण्यवान सत्यवान जगी
महती त्याची सावित्रीमुळे !!३!!

आजची सावित्री नवदुर्गा
झगडते ती दोन्ही डगरी
संसार नोकरी दोन्ही धुरा
झगडत लपवत आसू अंतरी !!४!!

कर्मकांडांना देऊनी फाटा
सावध ऐका पुढल्या हाका
मान द्या परस्पर भावनांना
हाच खरा वटपूजेचा धडा !!५!!

काळ महिमा पुढे चालती
गरज समजुनी व्रते करती
ओळखा पाऊले प्रभातीची
नका आग्रह माऊलीवरती !!६ !!

राहो अखंड साथ सोबतीची
जपू या नाती विश्वासाची
प्रेम, समता, परस्पर आदर
हीच खरी पूजा वटवृक्षाची !!७!!

..........................................

पल्लवी उमेश
जयसिंगपूर
29.06.26

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू