पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवणीच्या वादळाने

तू जवळ नाही, अन् सगळंच शांत झालं,
आठवणींच्या वादळाने मन मात्र अशांत झालं.

काय जीन माझं, 

अस्वस्थ पडून मी.

सुख ओसरून गेल आणि दुख अनंत झालं.


संपलं सर्व काही, इच्छांचही मरण झालं.
दगदगीच्या जीवनातून, 

जीन आता निवांत झाल.



तू नाही येथे तरी, असण्याचा भास तुझा. 

तुटून जावे हे बंधन, 

आता तुझ्याविना सर्वकाही भ्रांत झालं



संपून जावे अंतर,सहवास लाभावा तुझा.

भेटीस तुझ्या सैरावैरा मी,

आणि मनही आक्रांत झालं.



हसू आटून गेल, वेदनाच राज्य आलं.

श्वास सुरू असूनही 

जगणं एकांत झालं.

आठवणीच्या वादळाने मन मात्र अशांत झालं.

तू जवळ नाही अन् सगळच शांत झालं.




प्रविण ज्यो. तायडे 

अमरावती 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू