संघर्ष अजून बाकी आहे
दुःखाची तक्रार केली नाही,
कधी जखमांचा विचार केला नाही.
सहन केल्या सर्व पीडा,
पण आसवांचा बाजार केला नाही.
आल्या जरी किती आपदा,
नेहमी तरी मी अडिग उभा.
संकटांना सामोरे जाताना,
अपयशाचा स्वीकार केला नाही.
नशिबाने दिला दगा जरी,
विश्वास जगण्याचा सोडला नाही.
आयुष्याशी दोन हात करताना,
हार मानण्याचा विचार केला नाही.
छातीत वेदना अजूनही आहे,
ओठांवर हसू कायम आहे.
प्रकाशातला जन्म माझा,
कधी जीवनात अंधार केला नाही.
श्वासात अजून धग शिल्लक आहे,
म्हणून संघर्ष अजून संपला नाही.
मंजिल असली दूर जरी,
प्रवासाला कधीच नकार केला नाही.
सहन केल्या सर्व पीडा,
आसवांचा कधी बाजार केला नाही.
दुःखाची कधी तक्रार केली नाही,
कधी जखमांचा विचार केला नाही.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
