स्वप्न एकच
संघर्षाच्या प्रत्येक पावलाला
यशाचा हात लाभावा,
जिने अंधारात खूप झाले
स्वप्न एकच -
रात्र मावळून प्रकाश व्हावा.
रोजचा शोध आता थांबला पाहिजे
खूप झाले सरपटणे;
स्वप्न एकच -
पंखांना आता नभ मिळावा.
जगण्याला जग असावे,
जगताना जगही समजावे
स्वप्न एकच -
दुःखाच्या लाव्ह्याला
सुखाचा अथांग सागर लाभावा.
वेदनांच्या राखेतून पुन्हा नवा अंकुर फुटावा,
हरवलेल्या आशेचा दीप पुन्हा उजळावा.
स्वप्न एकच -
आयुष्याला जगण्याचा अर्थ मिळावा.
थकलेल्या मनाला शांततेचा स्पर्श व्हावा,
डोळ्यांतील प्रत्येक अश्रू मोत्यासारखा फुलावा.
स्वप्न एकच-
उरलेल्या प्रवासात दुःख नव्हे,
प्रेमाचा सहवास लाभावा.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
