कसा हा खेळ तुझा
किती हा छळ तुझा,
सोनेरी गळ तुझा.
जखमा रोजच खातो मी,
स्वभाव ओळखणं अवघड तुझा.
कधी ऊन, कधी सावली,
कसा हा खेळ तुझा.
ध्येया पासून विचलीत तु
कसा धरावा मेळ तुझा.
पावलो पावली काटे पेरले
फुलांची कशी करू आस तुझ्या
तुला हृदयात जपलं मी,
समजलो नाही भावनांचा खेळ तुझा.
थकलो तरी चालत राहलो,
साथ देशील विश्वास तुझा
खोट्या प्रेमाने उबगलो आता,
कसा करू सांभाळ तुझा?
जगता याव म्हणून शोधतो श्वास तुझा,
हसण्याचा क्षण आला जरी,
डोळ्यात अश्रूचा मेळ तुझा.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
