वारी
वारी
पंढरीचा वारकरी
भक्त विठू माऊलीचा
जातो भक्तीत रंगूनी
ध्यास विठू चरणाचा
देह भान सोडूनिया
वाट पावले चालती
मुखी नाम माऊलीचे
तोच सोयरा सांगाती
चंद्रभागा ती विसावा
कष्ट वारीचे घालवी
करी पापाचे क्षालन
वाट मुक्तीची ती दावी
दिसे दुरून कळस
भक्त धन्य धन्य होई
धाव घेती पावले ती
मुख दर्शनाची घाई
बघ आलो पांडुरंगा
दिंड्या पताका घेऊनी
आलो घेऊन पालखी
बघ संसार सोडूनी
भक्त म्हणे विठूराया
भक्ता मुक्ती तुझ्या दारी
नको गुंतवू पाशात
घडो मोक्षाचीच वारी
जयश्री देशकुलकर्णी
कोथरूड, पुणे -३८
मो.- 9423569199
