पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वारी

पाहण्या सावळा हरी जनसागर चाले पंढरीची वारी 

भीमा यमुना चंद्रभागेच्या तिरी 

संत अभंगाच्या बरसती सरी

ऊन पावसाची कोणी तमा ना धरी 

आनंदाच्या वातावरणाचे रिंगण उत्साह द्विगुणित करी

जरी उभा विटेवरी हात ठेवुनी कटेवरी 

परी प्रेमाची सावली धरी ती माऊली सर्वांवरी

सोडूनी उच्च नीच,जात पात, राजा रंक 

सर्व होती विठू नामाच्या गजरात दंग

वर्षानुवर्ष चालली ही वारीची ही रीत 

पांडुरंगही जाणे वारकऱ्यांची त्याच्यावरील प्रीत

दिसता वनमाळी डोळा

सफल होई हा मनुष्य जन्म भोळा..

 

नयना..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू