वादळातला दिवा
धागा विश्वासाचा कापला, घेऊनी दगा कातर ,
मी दिवा वादळात लावला, घेऊन तुझ्या ओंजळीचा आधार.
हात मायेचा शिरी, खुपसला पाठीत खंजीर.
ठेऊन ओठांवर हसू, दिल्या जखमा गंभीर
मी दिवा वादळात लावला, घेऊन तुझ्या ओंजळीचा आधार.
उन्हात भटकत होतास, तुला सावलीत घेतले.
मी चालताना अनवाणी, तू काटे वाटेत पेरले.
स्वप्न सुखाचे पाहताना, केला दुःखाचा प्रहार
हृदयात आता उरला, फक्त तुझ्या वेदनेचा भार
मी दिवा वादळात लावला, घेऊन तुझ्या ओंजळीचा आधार.
विणले होते घरटे मी प्रेम धाग्यात,
विखरून गेले स्वप्न एका शूद्र वादळात.
शपथ सात जन्माची, मग साथ सोडण्यास का अधीर?
काळीज तार तार झाले, सांगना घेऊ कोणाचा आधार?
मी दिवा वादळात लावला, घेऊन तुझ्या ओंजळीचा आधार.
मी दिवा वादळात लावला...,....
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती