कुरवाळू नको जुन्या घावाला
मनातल्या भावना मनातच ठेव,
बाहेर आल्या तर जखमा होईल.
कुरवाळू नको जुन्या घावाला,
पुन्हा माशांचा बाजार होईल.
जुने भेटणे, जुने भांडणे,
जुन्या आठवणी जुन्याच राहू दे.
वैर असेल तर असू दे,
कर कर्म असे की सत्कार होईल.
या मातीच्या बाहुल्याला
क्षणभराचा श्वास आहे;
त्या प्रत्येक श्वासात असू दे प्रेम,
मग जगणे साकार होईल.
अनेक जीवांची एकच वाट आहे,
ज्यावर असेल सत्याच्या पाऊलखुणा, मग असू दे त्याच वाटेने प्रवास तुझा, तुझ्या कर्मांचा प्रचार होईल.
कुरवाळू नको जुन्या घावाला,
पुन्हा माशांचा बाजार होईल.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
8830103626
