Back to Book Details Report Reviews

हृदयातील ब्लॉकेज

हृदयातील ब्लॉकेज


ओझं विचारांचं मी रोजच वाहत आहे,
तो कोण असेल, जो हृदयातलं रक्त ब्लॉकेज बनून रोखत आहे?

रोज विचारतो मी काळजाला,
पण गुपित ते लपवत आहे.
आज विचारतो डॉक्टरला,
असा जिवलग कोण आहे,
जो माझ्याच हृदयात राहून
मला मरणाच्या दारात लोटत आहे?

तो कोण असेल,
जो हृदयातलं रक्त ब्लॉकेज बनून रोखत आहे?

आपले समजुनी ज्यांना मी हृदयात जागा दिली,
आज तेच ब्लॉकेज बनून माझा घात करत आहे.
आता वेदना असह्य झाली,
आपले असो की परके, सर्वांना रजा देत आहे;
म्हणूनच आज मी
माझ्या हृदयाची सफाई करत आहे.

ओझं विचारांचं मी रोजच वाहत आहे,
तो कोण असेल,
जो हृदयातलं रक्त ब्लॉकेज बनून रोखत आहे?



प्रविण ज्यो. तायडे 

अमरावती 

8830103626

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu