प्रेमाचा कारावास
कैद कर मला आणि दे लांब कारावास,
फक्त एकच इच्छा –
पहारा असावा तुझा माझ्या आसपास.
रामा प्रमाणे मिळाला जरी वनवास,
पण सीते प्रमाणे लाभावा तुझा सहवास.
वाटा वेगळ्या असल्या, तरी सोबत असावा प्रवास,
अनोळखी नजरेतही राहावा प्रेमाचा आभास.
शिक्षा तुझी असेल तर स्वीकारेन प्रत्येक त्रास,
फक्त आयुष्यभर राहू दे, तुझा माझ्याभोवती श्वास.
कैद कर मला आणि दे लांब कारावास,
फक्त एकच इच्छा –
पहारा असावा तुझा माझ्या आसपास.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
