नियतीचे लेखन
क्षणाचा भरोसा नाही, नशिबाचा खेळ कोण जाणे,
भोग भोगावेच लागतात, दैवापुढे कुठले बहाणे?
त्याच्याच मर्जीने येणे, त्याच्याच मर्जीने जाणे,
सुख-दुःख त्याच्याच हाती, मग कशाला रडगाणे?
जे होईल ते होऊ दे, बेफिकीर जगावे जगणे,
चिंता नको कशाची,
ज्याने चोच दिली तोच देईल दाणे.
येणे-जाणे हातात नाही, मिळेल ते स्वीकारा प्रेमाने,
राजा असो वा रंक, शेवटी सर्वांनाच आहे मरणे.
आज मिळाले जे जीवन, हसत-हसत त्याला जगणे,
उद्याचा भरोसा कुणाला? क्षणात बदलते सारे गाणे.
मूठभर मातीचा हा देह, कशाला त्याचा अभिमान करणे?
काळ आला की सारे सोडून, एकट्यानेच पुढे जाणे.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
