Back to Book Details Report Reviews

मनाला कुठे आले मरण?

या देहाच्या संकेतांना काय समजावे,
थरथरणारे हात अन् सुरकुत्यांचे व्रण;
डोळे नमले अन् शरीर थकले,
मग आयुष्याशी संपले का माझे रण?

माझाच प्रश्न मला पडतो,
येणार होता असा क्षण;
तर का केले चांगले खाणे-पिणे,
का जपले इतके हे देहधन?

रंग उडाला, धवल झाले केस,
निसर्ग देतो रोज नवा संदेश;
जगण्याचे ऋण फेडायचे असेल तर,
जनकल्याणासाठी लागू दे तुझा प्रत्येक क्षण.

याच विचारांत भटकत आहे,
विचारांच्या जाळ्यात मन अटकत आहे;
गोंधळलेल्या या मनाला प्रश्न पडतो गहन.
निसर्गाला शरण जाऊ, की मनाला शरण?

पण मन म्हणते—थांब अजुनी,
श्वासांत उरले आहेत काही क्षण;
वय जरी झाले शरीराचे,
मनाला कुठे आले आहे मरण?

प्रविण ज्यो. तायडे

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu