उरलेल आयुष्य तुझ्यासवे
तुला सोडून दूर निघून जावं,
वाटतं कधी एकटंच राहावं;
पण तुझ्याशिवाय माझं जगणं नाही,
मी तुझाच आहे—हे तुला पटावं.
आयुष्य अर्धं उलटून गेलं,
चार दिवसांचं जगणं बाकी;
अंत असावा या वादाचा,
आरोपांचं धुकं सरावं;
उरलेला प्रत्येक क्षण तुझ्यासवे,
नको आता मनात कुठली खंत बाकी.
रुसवे-फुगवे सारे विसरून,
पुन्हा प्रेमाने जवळ यावं.
तू समजून घ्यावंस माझं मन,
मीही तुझ्या मनाला जपावं;
उरलेलं हे थोडंसं आयुष्य,
तुझ्या हातात हात घेऊन जगावं.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
