नको छळू वादळाला
नको छळू वादळाला,
उगाच हवेला पंख लावू नको;
घाल गवसणी आभाळाला,
क्षितिजाला पाहून भारावू नको.
घेताना शोध त्या तारांचा,
मनी अंधार ठेवू नको;
धरतीच्या हिरवळीवर कधी,
क्रोधाचा नांगर चालवू नको.
स्वप्नांना दे भरारी, पण
पाय जमिनीवर असू दे;
जिंकताना या जगाला,
माणूसपण विसरू नको
वादळ येईल, वारा सुटेल,
क्षणांना घाबरू नको;
आभाळ जरी दूर असले,
उंच भरारी थांबवू नको.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
