आपले म्हणू कुणाला
आपलेच जे झाले परके,
मग आपले म्हणू कुणाला.
शब्दांचे बोचरे घाव मनाला,
आपल्यांचेच वार सारे,
सांगू कुणाला?
जेथे जखमांच्या रक्ताचा व्यापार होतो,
तेथे आसवांचे कोण ऐकतो?
अशा जगात मनाच्या व्यथा,
सांगू कुणाला?
फुलांच्या आडून काटे पेरतात,
मग विश्वासाने गळे कापतात.
येथे जखमींचा कोणी न वाली,
रक्तबंबाळ जखमा
दाखवू कुणाला?
जे माणसे साधे दिसतात चेहऱ्याने,
तेच गळा कापतात हसतमुखाने.
पावलोपावली बगळे बसले,
मग आपले म्हणू कुणाला?
हसताना सोबत सारे,
रडताना कुणी दिसेना.
हिरव्या झाडाला खोपे खूप,
जळत्या झाडावर कोणी बसेना.
जखम दिली ज्यांनी मनाला,
त्यांचा दोष सांगू कुणाला?
आपलेच जे झाले परके,
मग आपले म्हणू कुणाला?
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
